नागपूर : सध्या महाराष्ट्रात ‘हिंदीची सक्ती’ आणि ‘मराठी अस्मिता’ या मुद्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादाची सुरुवात राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाने झाली, ज्यामध्ये इयत्ता १ ते ५ पर्यंतच्या शाळांमध्ये त्रिभाषा सूत्रांतर्गत हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र आक्षेप घेतला.












