महाराष्ट्रात मराठी आणि हिंदीचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्रिभाषा सूत्रानुसार तिसरी भाषा पहिलीपासून सुरु करण्याच्या निर्णयाला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी विरोध दर्शवला. ज्यानंतर पावसाळी अधिवेशन सुरु होण्याच्या एक दिवस आधी सरकारने त्रिभाषा सूत्रासाठी डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आणि आधीचे दोन्ही अध्यादेश रद्द केले. यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी वरळी या ठिकाणी विजयी मेळावा घेतला. ठाकरे बंधू एकत्र येण्याची ही सुरुवात आहे अशी चर्चा रंगली. दरम्यान शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी ठाकरे कुटुंबच महाराष्ट्रात मगध येथून आलं आहे असं म्हणत हे दोन भाऊ फक्त मराठीच्या नावाने राजकारण करत असल्याचं म्हटलं आहे.












