ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका व्यापाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली होती. त्या घटनेनंतर परप्रांतीयांच्या मुद्यांवरून भाजपा आणि मनसे नेत्यांमध्ये जोरादार आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण तापलं आहे. यातच भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी या वादाच उडी घेत ठाकरे बंधूंना डिवचलं. दुबे यांनी एक्सवर एक पोस्टही केली होती. तसेच काही माध्यमांशी बोलताना दुबे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ‘महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय’, अशा प्रकारचं विधान दुबे यांनी केलं होतं.












