आईला भूतबाधा झाली आहे मी उपाय करतो असं म्हणत एका मुलाने त्याच्याच आईला मारहाण करत तिची हत्या केली. ही घटना कर्नाटकमधल्या शिवमोगा या ठिकाणी घडली आहे. मृत महिलेवर कथित रुपाने आत्म्याची सावली होती असं या मुलाचं म्हणणं होतं. केवळ अंधश्रद्धेतून ही घटना घडली आहे. या हत्या प्रकरणात पोलिसांनी मृत महिलेचा मुलगा संतोष आणि आशा नावाची एक महिला या दोघांना अटक केली आहे.












