मीरा-भाईंदरमध्ये परप्रांतीयांनी नुकताच मोर्चा काढला होता. तेव्हापासून शहरात मराठी विरुद्ध अमराठी असा वाद चालू झाला आहे. दरम्यान, परप्रांतीयांच्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून आज शहरातील मराठी भाषिकांनी मराठी एकीकरण समिती व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे देखील या मोर्चात सहभागी झाले होते. मात्र, ते अवघ्या १० मिनिटात ते तिथून निघून गेले. या १० मिनिटात त्यांच्याविरोधात घोषणाबाजी झाली, तसेच एका समाजकंटकाने त्यांच्या दिशेने बाटली भिरकावल्याचा प्रकारही घडला.












