अंकिता लोखंडे व विकी जैन हे टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. हे दोघेही लाफ्टर शेफच्या दोन्ही सीझनमध्ये झळकले आहे. या शोमधील अंकिताच्या एका वक्तव्यामुळे ती गरोदर असल्याच्या चर्चा बऱ्याच काळापासून होत आहेत. ‘लाफ्टर शेफ्स २’ च्या सेटवर कृष्णा अभिषेक अंकिताला पळायला लावत होता, तेव्हा अंकिताने ती गरोदर असल्याचं म्हटलं होतं.
अंकिताच्या या विधानानंतर ती लवकरच आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार असल्याची चर्चा सुरू झाली. आता अंकिता आणि विकी यांनी अखेर गरोदरपणाच्या अफवांवर मौन सोडले आहे. “अशा बातम्या तर खूप दिवसांपासून येत आहेत. मी गरोदर केव्हा असेन हा प्रश्न खूप दिवसांपासून विचारला जात आहे. घरचेही सगळे विचारत आहेत. वाटाघाटी, चर्चा सुरू आहे. मी या प्रश्नांमुळे थकलेय. मला माफ करा, जेव्हा मी गरोदर असेन तेव्हाच मी या प्रश्नाचं उत्तर देईन,” असं अंकिता म्हणाली.












