मराठी कलाविश्वाची ‘अप्सरा’ म्हणून अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला ओळखलं जातं. ‘नटरंग’, ‘हिरकणी’, ‘मितवा’, ‘पोश्टर गर्ल’ अशा बऱ्याच गाजलेल्या चित्रपटांमध्ये सोनालीने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आपल्या वैयक्तिक जीवनातील प्रत्येक अपडेट सोनाली इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. नुकताच अभिनेत्रीने शेअर केलेला डान्स व्हिडीओ सर्वत्र चर्चेत आला आहे.












