बिहारच्या पाटणामध्ये ४ जुलै रोजी रात्री प्रसिद्ध व्यावसायिक तथा भाजपाशी संलग्न असलेल्या गोपाल खेमका यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे बिहारमध्ये मोठी खळबळ उडाली. तसेच पाटणा पोलीस प्रशासनाबाबत आणि कायदा सुव्यवस्थेबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. दोन बाइकस्वारांनी गोपाळ खेमका यांना समोरून डोक्यात गोळ्या घालत त्यांची हत्या केली. ही घटना ज्या ठिकाणी घडली, त्या ठिकाणाहून पोलीस ठाणे अवघ्या ५०० मीटर अंतरावर आहे. पण असं असतानाही अशा प्रकारची घटना घडल्यामुळे पोलीस प्रशासनावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.












