कर्नाटकमधील एका माजी सफाई कर्मचाऱ्याने पोलिसांना लिहिलेल्या एका पत्राने खळबळ उडवून दिली आहे. या व्यक्तीने त्याला जवळपास १० वर्षांपूर्वी हत्या करण्यात आलेल्या अनेकांचे मृतदेहांचे दफन करण्यास भाग पाडण्यात आले होते असा दावा केला आहे. पश्चातापाच्या भावनेतून पद्धतशीरपणे झाकून टाकण्यात आलेला हा भीषण गुन्हा उघड करण्यासाठी आपण पुढे आल्याचे या व्यक्तीने म्हटले आहे. द इंडियन एक्सप्रेसने यासंबंधिचे वृत्त दिले आहे.
वकील ओजस्वी गौडा आणि सचिन देसपांडे यांनी हे पत्र प्रसिद्ध केल्यानंतर दक्षिम कन्नडा जिल्ह्यातील धर्मस्थळ पोलिसांनी शुक्रवारी भारतीय न्याय संहिता कलम २११ (अ) (कायद्याने बंधनकारक असणाऱ्या व्यक्तीने सरकारी सेवकाला माहिती देण्यास नकार देणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
धर्मस्थल येते १९९५ ते २०१४ पर्यंत सफाई कर्मचारी म्हणून काम केलेल्या या व्यक्तीने असाही दावा केला आहे की त्याने अत्यंत क्रूर पद्दतीने काही हत्या होत असताना पाहिल्या आणि त्यानंतर त्याला मृतदेहांची विल्हेवाट लावण्यास भाग पाडण्यात आले. दरम्यान ही तक्रार करणाऱ्या व्यक्तीची ओळख त्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव उघड करण्यात आलेली नाही.












