चंद्रभागेच्या तीरावर वसलेल्या पंढरपूर येथे पांडुरंग विठ्ठल विटेवर उभा आहे. कित्येक युगं लोटली तरी तो तसाच उभा आहे. दरवर्षी या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाला महाराष्ट्रातील सर्व कोपर्यांमधून वारकरी मोठ्या भक्तीने पंढरपूरात येतात. पण हा परमेश्वर विठ्ठल नेमका कोण आहे? आणि तो विटेवर कसा उभा राहिला यामागे एक आख्यायिका सांगितली जाते. इतिहास अभ्यासक, संत साहित्याचे अभ्यासक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सदानंद मोरे यांनी सह्याद्री या वाहिनीला काही वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत विठ्ठल विटेवर उभा राहण्यांसंबंधीची आख्यायिका सांगितली आहे.












