अहमदाबादमधील एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात अद्याप कुणी विसरलेलं नाही. या अपघातात २७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. अद्यापही या अपघाताचं नेमकं कारण समोर आलेलं नाही. यावरून वैमानिकाचं काम किती आव्हानात्मक असतं, याची प्रचिती येते. २०२१ साली पुण्यातील बारामती येथे प्रशिक्षणार्थी विमान कोसळण्याची घटना घडली होती. सुदैवाने विमानातील वैमानिक २४ वर्षीय तरुणी भाविका राठोड यातून सुखरूप बचावली. वैमानिक म्हणून अधिकृत मान्यता मिळविण्यासाठी केवळ ५० तासांच्या उड्डाणाचं प्रशिक्षण बाकी असताना भाविकाबरोबर अपघात घडला. पण यानंतरही जिद्दीनं तिनं हे प्रशिक्षण पूर्ण केलं.












