गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्र मराठी विरुद्ध हिंदी असा भाषिक वाद पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा आधार घेऊन राज्य सरकारने पहिलीपासून मराठी भाषा शिकण्यासंदर्भात आदेश जारी केला. पण या निर्णयाला सामाजिक व राजकीय वर्तुळातून झालेला विरोध लक्षात घेता महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू व्हायच्या आदल्या दिवशीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यासंदर्भातले अध्यादेश रद्द केल्याचं जाहीर केलं. या पार्श्वभूमीवर मराठी भाषेचा विषय चर्चेत असतानाच मुंबईतील एका व्यावसायिकानं थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच आव्हान दिलं आहे.












