जयंत आणि जान्हवीच्या आयुष्यात काही दिवसांपूर्वीच एका नव्या पाहुण्याची एन्ट्री झाली आहे. हा पाहुणा नेमका कोण असणार याची सगळ्यांनाच आतुरता होती. अखेर जयंत-जान्हवीच्या घरी सशाचं आगमन झाल्याचं पाहायला मिळालं. जान्हवीने या सशाचं नाव बबुच्का असं ठेवलं आहे.
सर्वांशी प्रेमाने, आपुलकीने वागून हसत-खेळत आयुष्य जगायचं असा जान्हवीचा स्वभाव असतो. पण, जयंत मात्र अगदी विरुद्ध स्वभावाचा असतो. आपल्या बायकोने कोणाशी मैत्री केलेली देखील त्याला आवडत नाही. जानूबाबत तो प्रचंड पझेसिव्ह असतो आणि यामुळे जान्हवीला दिवसेंदिवस प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून जयंत जान्हवीचा कॉलेजमधील जिवलग मित्र ‘मॅड’ ( विश्वा ) नेमका कोण आहे याचा शोध घेत होता. यानंतर भावना-सिद्धूच्या लग्नामुळे जयंतने मॅडचा शोध घेणं थांबवलं होतं. अशातच जयंत जान्हवीच्या घरात सशाचं आगमन होतं. जान्हवी सशाला पाहून खूपच आनंदी होते…आता ती दिवसरात्र या सशाची काळजी घेताना मालिकेत दिसणार आहे.













