आपल्या जवळच्या व्यक्तीच्या अचानक जाण्याचं दुःख स्वीकारणं सोपं नसतं. अभिनेता पराग त्यागी सध्या अशाच कठीण काळातून जातोय. त्याची पत्नी शेफाली जरीवालाचं शुक्रवारी (२७ जून रोजी) निधन झालं. पराग व शेफालीचं एकमेकांवर खूप प्रेम होतं, शेफालीच्या निधनाआधी दोघांनी एकत्र अनेक मुलाखती दिल्या होत्या. त्या मुलाखतीतील व्हिडीओ आता व्हायरल होत आहेत. ते पाहून चाहते परागबद्दल काळजी व्यक्त करत आहेत.












