पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या गेल्या १० वर्षांतील त्यांच्या सर्वात मोठ्या विदेश दौऱ्यावर असून गुरुवारी त्यांनी घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन द्रमानी महामा यांची भेट घेतली. यावेळी महामा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा घानाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान केला. ‘द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना’ असं या पुरस्काराचं नाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं प्रशासकीय नेतृत्व आणि जागतिक स्तरावर नावाजलेलं नेतृत्व याप्रीत्यर्थ हा सन्मान करण्यात आल्याचं घाना सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.












