लॉकडाऊननंतर भारतात ओटीटीवरील सीरिज आणि चित्रपट पाहणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. ओटीटीवर येणारा नवनवीन कंटेट पाहण्यासाठी अनेक ओटीटी प्रेमी उत्सुक असतात. अशातच वेबसीरिज प्रेमींसाठी हा जुलै महिना खास असणार आहे. या महिन्यात ओटीटीवर थ्रिलर, ड्रामा, ऐतिहासिक आणि विनोदी अशा सगळ्या प्रकारच्या कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या महिन्यात कोणत्या सीरिज तुमच्या भेटीला येणार आहेत? चला जाणून घेऊ…












