भारतीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना जाहीर केले आणि त्यांना ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय दिला होता. दरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून या निर्णयाला आव्हान देत अंतरिम दिलासा मिळावा अशी मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दखाल करण्यात आली आहे. या ठाकरे गटाकडून दाखल केलेल्या याचिकेनंतर हे प्रकरण १४ जुलै रोजी सुचिबद्ध करण्याचे बुधवारी (२ जुलै) रोजी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले आहे.












