अकोला : ग्राम विकासाचा चेहरा म्हणून ‘मुख्यमंत्री समृद्ध ग्राम योजना’ येत्या १७ सप्टेंबरपासून राबवली जाणार आहे. सर्व योजना यशस्वीपणे राबवणाऱ्या गावांना पारितोषिके दिली जातील. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून उत्कृष्ट रस्ते, स्वच्छता सुविधा, कार्यालये, शाळा, अंगणवाडी इमारती सुसज्ज असणार्या आणि इतर निकष पूर्ण करुन गावाचा विकास साधणाऱ्या ग्रामपंचायतींना गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आज येथे दिली.












