9.5 C
New York
Wednesday, January 14, 2026

Buy now

spot_img
spot_img

“अशी वेळ कुणावरही येऊ नये”, शेफालीच्या अस्थी छातीशी धरून हमसून हमसून रडला पराग त्यागी; हृदयद्रावक Video Viral

अभिनेत्री शेफाली जरीवालाचं शुक्रवारी २७ जून रोजी निधन झालं. तिच्यावर शनिवारी ओशिवारा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पती पराग त्यागी व शेफालीच्या कुटुंबाने साश्रूनयनांनी तिला अखेरचा निरोप दिला. आज रविवारी पराग व शेफालीचे कुटुंबीय तिच्या अस्थी घेण्यासाठी ओशिवारा स्मशानभूमीत गेले होते, तेथील त्यांचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

शेफाली जरीवालाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तिच्या निधनामुळे पती पराग त्यागी व कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शेफालीची आई आक्रोश करत आहे. परागही पत्नीच्या आकस्मिक निधनाने खचला आहे. शनिवारी तिच्यावर अंत्यसंस्कार केल्यानंतर आज परागचे काही व्हिडीओ समोर आले आहेत.

पराग त्यागी, शेफालीची बहीण, तिचे आई-वडील व घरातील इतर काही जण शेफालीच्या अस्थी नेण्यासाठी स्मशानभूमीत गेले होते. शेफालीच्या अस्थी घेतल्यानंतर परागला रडू कोसळलं. शेफालीच्या अस्थी छातीला कवटाळून तो हमसून हमसून रडू लागलं. कुटुंबियांनी त्याला धीर दिला, त्यानंतर त्याने स्मशानभूमीत इतर विधी पूर्ण केले.

पाहा व्हिडीओ-

पराग व शेफालीचे कुटुंबीय तिच्या अस्थी घेऊन जुहू बीचवर गेले. तिथे समुद्रात त्यांनी अस्थी विसर्जन केले. यावेळी शेफालीच्या आईला अश्रू अनावर झाले.

पराग व शेफालीच्या कुटुंबाचे हे व्हिडीओ पाहून नेटकरी भावुक झाले आहेत. अशी वेळ कुणावरही येऊ नये, परागचं शेफालीवर प्रचंड प्रेम होतं, तिच्या जाण्याने तो खचला आहे, त्याला या कठीण परिस्थितीतून सावरण्याचं बळ मिळो, अशा कमेंट्स या व्हिडीओवर नेटकरी करत आहेत.

दरम्यान, ‘कांटा लगा गर्ल’ शेफालीचा रक्तदाब कमी झाला होता, तिच्यावर उपचार करण्यात आले होते. पण नंतर तिचा रक्तदाब पुन्हा वाढला आणि तिला हृदयविकाराचा झटका आला. पराग व इतर काही जण तिला अंधेरीतील रुग्णालयात घेऊन गेले, पण डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. त्यानंतर कूपर रुग्णालयात तिचे शवविच्छेदन करण्यात आले आणि शनिवारी तिचे पार्थिव कुटुंबियांना सोपवण्यात आले. कुटुंबियांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले आणि आज तिचे अस्थी विसर्जन करण्यात आले.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in