‘कांटा लग गर्ल’ शेफाली जरीवालाचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. शुक्रवारी, २७ जूनच्या रात्री ही धक्कादायक घटना घडली. शेफालीला पती परागने रुग्णालयात नेलं, पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. शेफालीवर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. आता तिच्या अंत्यसंस्कारातील काही हृदयद्रावक व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
शेफाली जरीवाला ही अभिनेता पराग त्यागीची बायको होती. शेफालीवर मुंबईतील ओशिवारा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तिला अखेरचा निरोप देण्याआधीचा स्मशानभूमीतील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत पराग व शेफालीची आई सुनीता जरीवाला आक्रोश करताना दिसत आहेत.
पराग व त्याच्या सासूबाई शेफालीच्या पार्थिवाजवळ बसलेले व्हिडीओत दिसतात. पराग शेफालीच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि तिच्या कपाळावर किस करतो. त्यानंतर बराच वेळ तो शेफालीच्या पार्थिवाशी बोलत असतो. तर, शेफालीची आई लेकीच्या पार्थिवावर हात ठेवून सून्न अवस्थेत बसलेल्या दिसतात. इन्स्टंट बॉलीवूडने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.












