-0 C
New York
Saturday, December 6, 2025

Buy now

spot_img
spot_img

आंबोलीजवळील कावळेसाद पॉईंटवर फोटो काढताना कोल्हापूरचा तरुण दरीत कोसळला; शोधकार्य थांबवले, उद्या सकाळी शोध मोहीम

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आंबोलीजवळील गेळे येथील कावळेसाद पॉईंटवर आज (शुक्रवार) सायंकाळी एक दुर्दैवी घटना घडली आहे. कोल्हापूर येथील ४५ वर्षीय राजेंद्र बाळासो सनगर (रा. चिले कॉलनी) नावाचा तरुण खोल दरीत कोसळला. ही घटना सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली असून, त्याचा शोध घेण्याचे काम सध्या थांबवण्यात आले आहे. उद्या शनिवारी सकाळी शोध मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, राजेंद्र सनगर हे रेलिंगच्या जवळ फोटो काढत असताना त्यांचा पाय घसरला आणि तोल जाऊन ते थेट दरीत कोसळले. कावळेसाद पॉईंट येथील दरी सुमारे ३०० ते ४०० फूट खोल असल्याची माहिती आहे.

पर्यटनासाठी आलेल्या मित्रांसोबत घडली घटना

मिळालेल्या माहितीनुसार, राजेंद्र सनगर आपल्या कोल्हापूर जिल्हा परिषद मधील २२ मित्रांसह आंबोली- गेळे परिसरात पर्यटनासाठी आले होते. ते कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या पंचायत समिती शिक्षण विभागात सरकारी नोकरीत असल्याची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली आहे. कावळेसाद पॉईंटवर दाट धुक्यात आणि वाऱ्यावर मौजमजा करत असताना त्यांनी फोटो काढण्याचा प्रयत्न केला. याचवेळी रेलिंगजवळून पाय घसरून ते दरीत कोसळले असल्याची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसांना दिली, असे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी सांगितले.

शोधकार्यात अडथळे, उद्या पुन्हा मोहीम

घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण या प्रकरणाची चौकशी करत आहेत. घटनास्थळी दाट धुके, वाऱ्यासह पाऊस आणि मोबाईल रेंजचा अभाव यामुळे शोधकार्य हाती घेण्यास मोठे अडथळे येत आहेत. रात्रीच्या अंधारामुळे आणि प्रतिकूल हवामानामुळे आपत्कालीन यंत्रणेने आजचे शोधकार्य थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या, शनिवारी सकाळी बाबल आल्मेडा रेक्सू टीम पुन्हा शोधमोहीम हाती घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पर्यटकांनी सुरक्षिततेचे नियम पाळावेत

कावळेसाद पॉईंट पर्यटकांमध्ये दाट धुके आणि सोसाट्याच्या वाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते. मात्र, यापूर्वीही या ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्या आहेत. त्यामुळे पर्यटकांनी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in