3 C
New York
Saturday, December 6, 2025

Buy now

spot_img
spot_img

जर्मनीहून टपालाद्वारे अमलीपदार्थांची तस्करी

मुंबई : जर्मनी देशातून आंतरराष्ट्रीय पोस्टाद्वारे एमडीएमए (एक्स्टसी) हा अंमलीपदार्थ मागवल्याच्या आरोपाखाली सीमाशुल्क विभागाने नवी मुंबईतून २८ वर्षीय तरूणाला अटक केली आहे. सीमाशुल्क विभागाने या कारवाईत सुमारे ८० ग्रॅम एमडीएमए जप्त केले असून त्याची किंमत सुमारे १६ लाख रुपये आहे. याशिवाय आरोपीच्या घरातून ७३ हजार रुपये रोख रक्कम सापडली आहे. या संपूर्ण प्रकरणामागे एका परदेशी नागरिकांचा सहभाग असल्याचा संशय आहे. ते खरेदी करण्यासाठी कूट चलनाचा वापर करण्यात आल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे.

कपिल हेमवानी (२८) असे अटक आरोपीचे नाव असून तो नवी मुंबईतील कोपर खैरणे परिसरातील रहिवासी आहे. बेलार्ड पिअर येथील परदेशी टपाल कार्यालयात जर्मनीवरून संशयीत पार्सल येणार असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पार्सल अडवण्यात आले. ते उघडून तपासणी केली असता त्यात ४८ ग्रॅम एमडीएमए सापडले. ते पार्सल नवी मुंबईतील कोपर खैराणे येथे जाणार होते. सीमाशुल्क विभागाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन त्या पार्सलद्वारे आरोपींना पकडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वाशी टपाल अधिकाऱ्यांच्या मदतीने पार्सलवर नमूद केलेल्या पत्त्यावर अधिकाऱ्यांनी भेट दिली.

पण तेथे कोणी अनिकेत कुमार नावाची व्यक्ती उपस्थित नव्हती. त्यानंतर ते पार्सल पुन्हा वाशी टपाल कार्यालयात आणण्यात आले. तेथे आरोपी कपिल हेमवानी ते पार्सल स्वीकारण्यासाठी आला. त्यावेळी त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या घरावर छापा टाकण्यात आला. तेथेही ३३ ग्रॅम एमडीएमए, वजन काटा व ७३ हजार रुपये सापडले. त्यानंतर सीमाशुल्क कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून कपिल हेमवानीला अटक करण्यात आली. त्याने यापूर्वी चार वेळा अशा प्रकारे परदेशातून आलेले अमलीपदार्थ स्वीकारले आहेत. त्यासाठी त्याला २० ते ३० हजार रुपये मिळायचे. त्याच्या एका नातेवाईकासह मिस्टर ड्रोन नावाच्या व्यक्तीचाही यात सहभाग आहे. तो परदेशी नागरिक असल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे.

अंमलीपदार्थ तस्करीसाठी टपालाचा कसा वापर होतो?

बीटकॉईनसारख्या कूट चलनाच्या सहाय्याने अंमली पदार्थांच्या खरेदी विक्रीचा व्यवहार होतो. अंमली पदार्थ खरेदी विक्री व्यवहार दिसतो, तितका सोपा नाही. डार्क- आणि डिप अशा दोन प्रकारात हा व्यवहार होतो. इंटरनेटवरील या तस्करांच्या साईटवर मेंबरशिप घ्यावी लागते. बीट काईनवर ही मेंबरशीप मिळते. या इंटरनेट साईटवर मेंबर होण्यासाठी बीट काईन खरेदी करावे लागतात. मात्र नुसते बीटकॉईन खरेदी करून देखील सदस्य केले जाईल याची कोणतिही खात्री नसते. जो पर्यंत या तस्करांना तुम्ही खरेच अमली पदार्थाची खरेदीसाठी सदस्य बनत आहात याची खात्री पटत नाही. तो पर्यंत तुम्हाला सदस्य करून घेतले जाऊ शकत नाही.

डार्कनेटवर असे क्रमांक व लिंक्स उपलब्ध आहेत. त्यामार्फत मेसेंजरद्वारे अंमली पदार्थ मागवले जाऊ शकतात. त्याची रक्कमही आभासी चलनामार्फत दिली जाते. या कोणत्याही व्यवहारात विक्रेत्याचा प्रत्यक्ष सहभाग येत नसल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. त्याच्या वितरणासाठी कुरियर व आंतरराष्ट्रीय टपास सेवेचा वापर होत असल्यामुळे ग्राहक व विक्रेता यांच्यात कोणाताही संबंध उतर नाही. परिणामी मुख्य आरोपींपर्यंत पोहोचणे जवळपास अशक्य झाले आहे.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in