मुंबई : स्टुडन्ट इस्लामी मुव्हमेट (सिमी) या प्रतिबंधित संघटनेचा माजी पदाधिकारी व दिल्ली-पडघा आयएसआयएस दहशतवादी मॉड्युल प्रकरणातील आरोपी साकीब अब्दुल हमीद नाचन (६३) याचा ब्रेन स्ट्रोकमुळे मृत्यू झाला. नाचनचे वकील समशेर अन्सारी यांनी नाचन याच्या मृत्युच्या वृत्ताला दुजोरा दिला. नाचन हा तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत असताना त्याला ब्रेन स्ट्रोक आला होता. त्यानंतर त्याला दिल्लीतील दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.












