2.3 C
New York
Tuesday, December 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

‘प्ले स्टोअर’वरील पाच लोन अ‍ॅप हटवले; सायबर पोलिसांची कारवाई

पिंपरी : विद्यार्थ्यांसह नागरिकांची फसवणूक करणाऱ्या अनधिकृत लोन अ‍ॅपविरोधात पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गुगल प्ले स्टोअरवरून पाच लोन अ‍ॅप हटवण्यात पोलिसांना यश आले असून यामुळे नागरिकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान टळले आहे.

गेल्या काही दिवसांपासून फसवणुकीच्या अ‍ॅप्सविषयी सायबर पोलीस ठाण्यात तक्रारी येत होत्या. या प्रकरणात गुन्ह्यांचे मूळ स्रोत गुगल प्‍ले स्‍टोअर वरील अ‍ॅप असल्याचे स्पष्ट झाले. नागरिकांकडून चौकशी केल्यानंतर या अ‍ॅपकडे आरबीआय, सेबीची अधिकृत परवानगी असल्याचे आढळून आले. पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे व सहायक निरीक्षक प्रविण स्वामी यांनी गुगलशी सातत्याने संपर्क साधून ‘क्रेडिट लेन्स’, ‘रॅकप्म्टा’, ‘आरपीएमटीए’, ‘क्रेडिट पायलट’ आणि ‘रेबा रोख’ हे पाच अ‍ॅप हटवले आहेत. याशिवाय ‘कीक्रेडिट’, ‘एससी एलिट व्हीआयपी’, ‘लुमेनमॅक्‍स’, ‘रूपांतरण’ या अ‍ॅप बंद करण्यासाठी देखील पत्रव्यवहार सुरू आहे.

नागरिकांनी कोणतेही लोन अ‍ॅप वापरण्यापूर्वी ते आरबीआय अथवा सेबीकडे नोंदणीकृत आहे की नाही, याची खात्री करूनच वापर करावा, असे आवाहन गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी केले.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनायक चौबे, सह आयुक्त डॉ. शशीकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आव्हाड, उपायुक्त संदीप डोईफोडे, डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस अंमलदार दिपक भोसले, वैशाली बर्गे, नितेश बिचेवार, स्वप्निल खणसे, स्मिता पाटील यांचा समावेश होता.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in