4.1 C
New York
Tuesday, December 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

बाळंतपणानंतर १७ दिवसांनी दिली नागरी सेवा परीक्षा! जाणून घ्या तिच्या यशाचा प्रवास

केरळच्या कोझिकोडमधून एक अशी कहाणी समोर आली आहे, जी केवळ प्रेरणादायक नाही, तर हेही दर्शवते की जर जिद्द असेल, तर परिस्थिती आपोआप मार्ग काढते. ही कहाणी आहे मालविका नायरची…

मालविका नायर, तिरुवल्ला येथील रहिवासी, हीने UPSC सिव्हिल सेवा परीक्षा २०२४ मध्ये ४५वी रँक मिळवली. तिने केवळ राज्यात टॉप केलं नाही, तर लाखो महिलांसाठी एक उदाहरणही ठरली. मालविकाने मेन्स परीक्षा त्या काळात दिली, जेव्हा ती नुकतीची आई झाली होती.

३ सप्टेंबर रोजी तिला मुलगा झाला, आणि डिलीव्हरीच्या १७ दिवसांनंतर, २० सप्टेंबर रोजी तिने UPSC मेन्स परीक्षा दिली. मालविकाचे पती IPS अधिकारी आहेत.

आई देखील, अधिकारी देखील

मालविका ही २०२० बॅचची IRS अधिकारी आहे आणि सध्या कोच्चीमध्ये इनकम टॅक्स डिप्टी कमिश्नर म्हणून कार्यरत आहे. UPSC २०२५ हा तिचा सहावा आणि शेवटचा प्रयत्न होता – आणि शेवटी तिने आपले स्वप्न पूर्ण केले.

UPSC निकालाच्या दिवशी ती आपले पती डॉ. एम. नंदगोपन यांच्यासोबत होती, जे सध्या हैदराबादमध्ये IPS ट्रेनिंग घेत आहेत. त्यानंतर दोघं तिरुवल्लामध्ये आपल्या घरी आले, जिथे त्यांचा परिवार त्यांची आतुरतेने वाट पाहत होता.

प्रेग्नन्सीमध्ये प्रिलिम्स

मालविका सांगतात, “मी प्रिलिम्स परीक्षेच्या वेळी मी गरोदर होते. आणि मेन्स परीक्षा म्हणजे माझ्यासाठी जणू एक युद्धच होतं – नवजात बाळासोबत अभ्यास करणं सोपं नव्हतं.” तिच्या आई-वडिलांनी, बहिणीने आणि पतीने तिची खूप साथ दिली आणि बाळाची काळजी घेतली.

मुलासोबत दिला UPSC इंटरव्ह्यू

मालविकाचे वडील के. जी. अजित कुमार हे केरळ फायनान्शियल कॉर्पोरेशनचे माजी AGM आहेत, आणि आई डॉ. गीतालक्ष्मी या एक स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. परीक्षेच्या वेळी तिचा मुलगा आदिसेश याला तिच्या वडिलांनी तिरुवनंतपुरम एक्झाम सेंटरपर्यंत घेऊन जात असत, जेणेकरून मालविका त्याला दूध पाजू शकेल. इंटरव्ह्यूच्या दिवशीसुद्धा, तिच्या चार महिन्यांच्या मुलाला दिल्लीपर्यंत नेण्यात आलं होतं.

यापूर्वीही दाखवले आहे कौशल्य

ही पहिली वेळ नाही आहे की मालविकाने UPSC मध्ये यश मिळवलं आहे. २०१९ मध्ये ११८वी रँक, आणि २०२२ मध्ये १७२वी रँक मिळवली होती.
त्यांचे पती नंदगोपन यांनीही २०२२ मध्ये २३३वी रँक मिळवून UPSC पास केले होते.

मालविकाच्या गोष्टीतून काय शिकायला मिळतं?

मालविकाची कहाणी हे शिकवते की परिस्थिती कशीही असो – जर जिद्द असेल, कुटुंबाची साथ असेल आणि मनापासून प्रयत्न केले, तर कोणतंही ध्येय अशक्य नाही. ती केवळ एक अधिकारी नाही, तर एक प्रेरणास्त्रोत आहे. कधी कधी यश केवळ रँकमध्ये नसतं – ते मनातील जिद्दीत असतं.

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in