याप्रकरणी यादवने ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून अज्ञात महिलेविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियम ६६ (ड), ६६ (क), तसेच फसवणुकीच्या कलम ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सायबर भामट्याने यादव यांना ओटीपी पाठवून मोबाइल हॅक केला. नंतर क्रेडीट कार्डाचे तपशील मिळवून खरेदी केली, असे ओशिवरा पोलिसांनी सांगितले.