UPSC Success Story: सुरभी गौतमची कहाणी अशा तरुणांसाठी प्रेरणा आहे ज्यांना असे वाटते की इंग्रजी कमी येत असल्यामुळे यश मिळत नाही. सुरभीने गेट, इस्रो, आयईएस आणि यूपीएससी सारख्या मोठ्या परीक्षा उत्तीर्ण केल्या. तिच्या इंग्रजीमुळे तिला चिडवलं जायचं पण तिने हार मानली नाही. तिचा प्रवास आज हजारो तरुणांसाठी एक उदाहरण आहे.
दरवर्षी लाखो विद्यार्थी यूपीएससीची तयारी करतात पण पहिल्याच प्रयत्नात आयएएस होणे हे फार कमी लोकांचे भाग्य असते. सुरभी गौतमने ते खरे करून दाखवले. एका छोट्या गावातून आलेली सुरभी लहानपणापासूनच अभ्यासात चांगली होती, परंतु इंग्रजी बोलण्यात तिच्या कमकुवतपणामुळे तिची थट्टा केली जात असे. तिने या कमकुवतपणाला आपले बलस्थान बनवले आणि आज आयएएस अधिकारी बनून ती लाखो तरुणांसाठी प्रेरणास्थान बनली. चला तर मग यानिमित्ताने जाणून घेऊया आयएएस सुरभी गौतमची यशोगाथा जी तुम्हाला प्रेरणा देईल.












