3.3 C
New York
Thursday, December 4, 2025

Buy now

spot_img
spot_img

ट्रकखाली चिरडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

पिंपरी : ट्रकखाली चिरडल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी मामुर्डी येथे घडली. नवीन बालाजी इडगुलू ( वय ३५, रा. शितळानगर, देहूरोड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी नवीन यांच्या पत्नीने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राम जालिंदर शेवाळकर (३९, देहूरोड) याला अटक करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन त्यांच्या दुचाकीवरून मामुर्डीच्या दिशेने जात होते. डी मार्टसमोर आल्यानंतर रामने डंपरने एका ट्रकला धडक दिली. ट्रकची धडक दुचाकीला बसली. या अपघातात नवीन ट्रकच्या चाकाखाली आले. ट्रकने दुचाकी काही अंतरापर्यंत फरफटत नेली. यामध्ये नवीन यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे.

टेम्पोची पोलीस वाहनाला धडक

पुणे-मुंबई महामार्गावर भक्ती शक्ती चौकाजवळ निगडी येथे वाहतूक नियमन करत असलेल्या पोलिसांच्या वाहनाला टेम्पोने धडक दिली. या अपघातात महामेट्रोचे तीन मदतनीस जखमी झाले. रोशन झुगरु रॉय (वय २८, बिहार) या टेम्पोचालकाला पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी हवालदार नागनाथ कानगुडे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लखन शिवाजी शिंदे, साहिल नारायण पवार, मोहन गंगाधर अवचार अशी जखमींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कानगुडे हे निगडी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री ते भक्ती शक्ती चौकाजवळ पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूक नियमन करत होते. त्यांच्यासोबत मेट्रोचे मदतनीस शिंदे, पवार आणि अवचार हेदेखील होते. रोशनने त्याच्या ताब्यातील टेम्पोने मेट्रोचे सुरक्षा कठडे आणि पोलिसांच्या मोटारीला धडक दिली

spot_img
spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

आमच्याबद्दल

भारत संग्राम (मराठी दैनिक)
RNI No. MAHMAR/2020/79677
मुद्रक: महादा आश्रु हिवाले
प्रकाशक: महादा आश्रु हिवाले
मालक: महादा आश्रु हिवाले
मुद्रण स्थल: आधार प्रिंटर्स, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
प्रकाशन स्थल: कार्याल दैनिक “भारत संग्राम”, महामाया निवास, गौरीशंकर स्कूल के सामने, नालंदानगर, वाशिम ता० जि०  वाशिम 444505 महाराष्ट्र
संपादक: महादा आश्रु हिवाले (सर्ववाद वाशिम न्यायालया अंतर्गत)
प्रकाशित असलेल्या सर्व लेख व वृत्ताशी संपादक सहमत असतीलच असे नाही। पी०आर०बी० एक्ट अनुसार संपादक जवाबदार)

संपर्क

Chief Editor DR.MADHAV ASHRUJI HIWALE

SHIWANERI BUILDING AKOLA NAKA WASHIM DIST WASHIM PIN 444505

CELL.9765332897

[email protected]

hellowashim.in