यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा ही जगातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर आयएएस, आयपीएस, आयआरएस, आयएफएस अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करता येते. पण, प्रत्येक जण यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकत नाही. अशा वेळी अपयश आले की, विद्यार्थी निराश होतात. कारण- काही जण फार कष्ट करून येथपर्यंत पोहोचलेले असतात. पण, याचबरोबर अनेकांची गोष्ट आपल्याला भरपूर प्रेरणासुद्धा देऊन जातात. तर आज आपण असेच एक आयएएस अधिकारी मंगेश खिलारी यांची कहाणी जाणून घेऊ…












