Israel-Iran conflict : अमेरिकेने इराणमधील तीन अणु प्रकल्पांवर हल्ला केल्यानंतर भारतातील अनेक राजकीय पक्षांमधील नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. अब्दुल्ला म्हणाले की, “मला दुखः या गोष्टीचं आहे की जे मुस्लिम राष्ट्र तेथे आहेत, ते देखील शांत बसून तमाशा पाहात आहेत. आज याची (इराण) ही परिस्थिती आहे, उद्या दुसर्यांचे देखील असेच हाल होतील, मी तुम्हाला सांगून ठेवतो आणि अमेरिका त्यांना देखील संपवण्याचा प्रयत्न करेल जे आज गप्प आहेत.”












