Bilawal Bhutto Statement On War: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सिंधू जल करारावरील स्थगिती भारत उठवणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर, पाकिस्तानमध्ये युद्धाची चर्चा सुरू झाली आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी इशारा दिला आहे की, जर सिंधू जल करारावरील स्थगिती उठवली नाही, तर पाकिस्तान युद्धाद्वारे सर्व सहा नद्या ताब्यात घेईल.












