नागपूर: केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे बिनधास्त बोलण्यासह नावीन्यपूर्ण प्रकल्पांवर काम करण्यासाठीही प्रसिद्ध आहे. नागपुरातील रेशीमबागमधील कवीवर्य सुरेश भट सभागृहात ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुळकर यांनी गडकरी यांची शनिवारी (२१ जून २०२५) प्रकट मुलाखत घेतली. यावेळी गडकरींनी बांबूपासून अंतर्वस्रे निर्मिर्ती बाबत माहिती दिली.
भा. ज. प. महानगरतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात नितीन गडकरी म्हणाले, बांबू हे शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचे असून त्यांना दोन पैसे मिळू शकतात. बांबूपासून मी विविध प्रयोगांवर काम करत आहे. बांबूपासून अंतर्वस्रे तयार करण्यावरही काम सुरू आहे. बांबू हे चांगले फायबर असून त्याने शरीराला घामही येत नाही. ती मुलायम आहे. बांबूची अंतर्वस्रांचे ब्रांडिंग झाल्यास काॅटनच्या कपड्यांची विक्री कमी होईल, असे गडकरी म्हणाले.
केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या एन. टी. पी. सी. कंपनीच्या वीज निर्मिती प्रकल्पातही बांबूचे ८ एमएमचे तुकडे पांढरा कोळसा म्हणून वापरणे सुरू झाले आहे. हे तुकडे एन. टी. पी. सी.कडून ७ रुपये किलोच्या दराने घेतले जात आहे. त्यामुळे येत्या काळात शेतकऱ्यांनी त्यांच्या धुरावर बांबू लावल्यास ते त्यांना खूप लाभदायक लाभदायक ठरणार आहे.












