मराठी कलाविश्वाच्या ‘सोनपरी’ म्हणून मृणाल कुलकर्णींना ओळखलं जातं. गेली अनेक दशकं त्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. ‘स्वामी’, ‘अवंतिका’, ‘सोनपरी’, ‘गुंतता हृदय हे’, ‘राजा शिवछत्रपती’ या त्यांच्या मालिका छोट्या पडद्यावर प्रचंड गाजल्या. याशिवाय अभिनेत्रीने मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा उमटवला आहे. अशा या प्रेक्षकांच्या लाडक्या अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे.
आज ( २१ जून ) वाढदिवसानिमित्त मृणाल कुलकर्णींवर मनोरंजन सृष्टीतून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. यासह त्यांची सून लोकप्रिय अभिनेत्री शिवानी रांगोळेने देखील सासूबाईंच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर केली आहे.












