गेल्या काही वर्षांमध्ये देशात आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. गुन्हेगार वेगवेगळ्या पद्धतीने नागरिकांना लुटत आहेत. यादम्यान मध्यप्रदेश स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ)ने संपूर्ण देशभरात चालवला जाणारा अंदाजे २,२८२ कोटी रूपयांचा गुंतवणूक घोटाळा उघड केला आहे. दरम्यान या गुन्ह्यातील प्रमुख सूत्रधार असलेल्या दीपक शर्मा आणि मदन मोहन या दोघांना पोलिसांनी दिल्लीहून अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये सात राज्यातील हजारो गुंतवणूकदारांना बॉटब्रो सारख्या ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या नावाखाली फसवण्यात आले आहे. हा प्लॅटफॉर्म शेल फर्ल यॉर्कर एफएक्स आणि यॉर्कर कॅपिटलद्वारे चारवला जात होता.
२०.१८ लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर महिन्याला ६ ते ८ टक्के परतावा देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा करत इंदोरमधील रहिवासी इशान सलुजा यांनी तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले.












