काँग्रेसचे नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मेक इन इंडिया उपक्रमावरून जोरदार टीका केली आहे. तसेच मेक इन इंडिया उपक्रमाच्या यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तसेच भारताच्या आर्थिक आव्हानांसाठी खऱ्या अर्थाने अंमलबजावणी करण्याऐवजी फक्त घोषणाबाजी करण्यावर केंद्र सरकार लक्ष केंद्रित करत असल्याचा आरोप खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त घोषणा करण्यात पुढे असल्याचंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.












