मुंबई : ‘दहिसर – अंधेरी पश्चिम मेट्रो २ अ’ आणि ‘दहिसर – गुंदवली मेट्रो ७’ मार्गिकांना प्रवाशांचा प्रतिसाद वाढत असून या दोन्ही मार्गिकांवरील दैनंदिन प्रवासी संख्येने बुधवार, १८ जून रोजी विक्रम केला. या मार्गिकेवरून बुधवारी तब्बल २ लाख ९४ हजार ६११ प्रवाशांनी प्रवास केला. या दोन्ही मार्गिकांवरील आतापर्यंतची ही सर्वाधिक प्रवासी संख्या आहे.












