जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज (शुक्रवारी) पुणे शहरात दाखल होत आहे. या दोन्ही पालख्यांच्या स्वागताची तयारी महापालिका प्रशासनाची पूर्ण झाली आहे.
पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची व्यवस्था महापालिकेने केली असून, यासाठी पालखी मार्गावर आरोग्य कक्ष, फिरती शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. महापालिकेसह विविध सामाजिक संस्था तसेच राजकीय पक्षांच्या मंडळींनीदेखील पालखीच्या स्वागताची तयारी केली आहे. या संबंधित बातम्यांसह मुंबई, मुंबई महानगर, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरांतील, परिसरांतील ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.












