बॉलीवूड अभिनेता आमिर खान याचा ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आज २० जूनपासून हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात आमिरसह अभिनेत्री जिनिलीया देशमुखही महत्त्वाच्या भूमिकेत आहे. अनेक दिवसांपासून आर. एस. प्रसन्ना दिग्दर्शित ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाची चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरलादेखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.












